Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

‘मीच माझा रक्षक’ म्हणत कोल्हापूरच्या तरुणाची जळगावात कोरोनाविरोधात जनजागृती

अभियानाचे कौतुक करीत अधिष्ठात्यांनी दिल्या सदिच्छा

by Divya Jalgaon Team
April 16, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
‘मीच माझा रक्षक’ म्हणत कोल्हापूरच्या तरुणाची जळगावात कोरोनाविरोधात जनजागृती

जळगाव : कोरोना महामारी थांबविण्यासाठी समाजातील अनेक घटक प्रयत्न करीत आहेत. यातच एक २९ वर्षीय तरुण थेट कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून जळगावात कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी आलेला आहे. शुक्रवारी १६ एप्रिल रोजी या तरुणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातांची भेट घेत हाती घेतलेल्या अभियानाबद्दल माहिती दिली.

नितीन गणपत नांगनूरकर असे या समाजजागृती करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो चंदगड तालुक्यात आमरोली या गावचा रहिवासी आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांनी या सायकल यात्रेला सुरुवात केली. कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव अशा आठ जिल्ह्यातून नितीन नांगनूरकर यांनी सायकलवर यात्रा पूर्ण केली आहे. शुक्रवारी शासकीय रुग्णालयात सायकलवर बॅनर लावून तसेच कोरोनाविरुद्धचे हस्तपत्रक वाटप करीत त्यांनी जनजागृती केली. ‘मी जबाबदार’ ‘मीच माझा रक्षक’ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या घोषवाक्यानुसार त्यांनी कोरोना महामारीपासून कसा बचाव करावा याबाबत रुग्णालय परिसरातील नागरिकांना माहिती दिली. त्यांचा पुढील प्रवास मुंबई आहे.

यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्या जनजागृती मोहिमेबाबत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी माहिती जाणून घेतली. जनजागृतीसाठी स्वतःचा वेळ, श्रम देणे महत्वाचे कार्य आहे असे सांगून अधिष्ठाता यांनी नितीन नांगनूरकर याना पुढील प्रवासासाठी सदिच्छा दिल्या.

Share post
Tags: 'मीच माझा रक्षक' म्हणत कोल्हापूरच्या तरुणाची जळगावात कोरोनाविरोधात जनजागृतीCivil HospitalJalgaonJalgaon news
Previous Post

नागरिकांना सूचना देण्यासाठी जनसंपर्क कक्षात लावला आवाजाचा भोंगा (व्हिडिओ)

Next Post

स्फोट : जिल्ह्यात आज 1030 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

स्फोट : जिल्ह्यात आज 1030 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group