जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नागरिकांच्या सुविधेसाठी जनसंपर्क कक्षात वॉर रूम स्थापन झाली आहे. रुग्णालयाच्या मुख्य परिसरात मध्यवर्ती भागात वॉर रूम असल्यामुळे तेथे आता शुक्रवारी नागरिकांना सूचना देण्यासाठी आवाजाचा मोठा भोंगा लावण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल झाले आहे. येथे कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच नुकत्याच लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या परिसरात नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, रुग्णालयाच्या मुख्य आवारात खाटा व्यवस्थापन, सुरक्षा, वाहने पार्किंग, स्वच्छता आदी कामकाज सोपे व्हावे म्हणून मध्यवर्ती ठिकाणी हि भोंग्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.