जळगांव – जेसीआय जळगाव डायमंड सिटी व मौलाना आझाद फाऊंडेशन तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी नागरिकांना पक्षासाठी परळ व धान्य वाटप तसेच शहरातील विविध ठिकाणी इमारतीच्या गच्चीवर धान्य व परळ ठेवण्यात आले.
या उपक्रमाची सुरवात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेस अजमल शाह व जिनल जैन यांचा हस्ते माल्यार्पण करून करण्यात आले.
सुशील अग्रवाल व फिरोज शेख यांचा हस्ते परळ व धान्य वाटप करण्यात आले. पक्ष्यांना रोज पाणी व धान्य टाकण्यासाठी संबंधित व्यक्तींनी जबाबदारी स्वीकारली.
या उपक्रमासाठी बबलू गंगावणे, भारती म्हस्के, ज्योती राणे यांचे सहकार्य लाभले. या वेळी अजमल शाह, जिनल जैन, फिरोज शेख, सुशील अग्रवाल, कुलदीप बुवा, मोनाली कुमावत,गणेश महाले आदींनी उपस्थित राहून अभिवादन केले.