चोपडा – कोरोना या वैश्विक महामारीमुळे छोटया – मोठ्या व्यवसाहिकांचे अतोनात हाल तर होत आहेतच शिवाय फोटोग्राफी व्यवसायातील ज्यांचे हात वर पोट आहे अशा मंडळीचे दिवस हालकीचे सुरु झाले आहेत. शासनाने फोटोग्राफर, छायाचित्रकार कलर प्रिंटलॅब, व इतर स्पॉट फोटोग्राफी करणाऱ्या व्यवसाहिकांना तातडीने मदत देऊन त्यांचे उपासमार थांबवावी अशी मांगणी छायाचित्रकार छोटू वारडे ( चोपडा ) यांनी केली आहे .
कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत वर्ष २०२० निघून गेले २०२०-२१ या वर्षात जानेवारी २१ पासून पुन्हा आजपर्यंत लॉकडाऊनचे चटके व हाल ग्रहण करतांना हातवर पोट भरुन उदरनिर्वाह करणाऱ्या फोटोग्राफर बंधूचे धंदे बंद पडले . महागडे कॅमेरे कर्जाने घेवून हप्ते कसे भरणार ? ह्या विंबचणेने व चिंताग्रस्त झालेल्या फोटोग्राफर बंधूची रोजी रोटी बंद झाली आहे .
संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात पत्रकार , स्ट्रीजर, प्रतिनीधी व चॅनेल इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेत छायाचित्रकारांच्या सहभाग आल्याशिवाय वृतांकन होत नाही ? तालुकास्तरावर लहान व्यवसाहिकांवर कोरोना मुळे तर संक्रांत आली आहे . लग्न , साखरपुडा समारंभ स्थानिक कार्यक्रम, सभा हे रद्द झाले . त्यामुळे पासपोर्ट फोटो काढायला देखील शाळकरी मुले – मुली येत नाहित; परिणामी कुठलेही छायाचित्र प्रकार काढणे बंद झाले असल्यामुळे गाव, तालुका, जिल्हास्तरावरील फोटोग्राफी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे .
दुकानाचे विज बील भाडे थकले, घरगुती संसारात कुटुंबाची होणारी उपासमार आणखी किती दिवस सहन करायची? असा सवाल वारडे यांनी केला आहे. प्रत्येक फोटग्राफर ला किमान १०,०००/- रुपये अनुदान मिळावे दुकानाची विज बिल माफ करावीत , गहू, तांदूळ, डाळींचे वाटप शासनाने तातडीने करावे तरच फोटोग्राफर उभा राहू शकेल असेही वारडे यांनी म्हटले आहे.
आम्ही केलेल्या मांगण्या या सर्व व्यवसायिक फोटोग्राफर बांधवांसाठी आहेत म्हणून या विषयी शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मागणी भगवान भवलाल वारडे उर्फ छोटू वा यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उत्कृष्ठ छायाचित्रकार आहेत म्हणून आमच्या मागण्यांकडे त्यांनी सहानुभूतीने विचार करावा…!