चोपडा – चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक यांनी दि १४ रोजी रात्री उशिरा दारूच्या नशेत डॉक्टरांशी वाद घालून असभ्य वर्तन केले म्हणून चोपडा तालूका इंडीयन मेडिकल अशोसीयशन संघटनेच्या वतीने तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात डॉक्टर संघटनेने म्हटले आहे की, दि १४ एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालयात तुषार पाठक व काही समाज कटकांनी सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांनाविरुद्ध असभ्य भाषेचा वापर केला असून संघटनेचे अध्यक्ष डॉ महेंद्र जैस्वाल, सेक्रेटरी मंगेश वैद्य,डॉ दीपक चौधरी, डॉ भरत पाटील,डॉ प्रेमचंद महाजन,डॉ जगदीश सरवैया,डॉ वैभव पाटील,डॉ पराग पाटील,डॉ केशरसिंग पाटील आदीनी निवेदन दिले आहे.
यावेळी संघटनेने चोपडा शहर पोलीस निरीक्षक यांना देखील निवेदन दिले आहेत.