चोपडा – तालुक्यातील आडगाव येथील मूळ रहिवासी व सध्या चोपडा गणेश कॉलनी वास्तव्यास असलेले चोपडा शेतकी संघाचे माजी चेअरमन तथा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष, सेवानिवृत्त विमा विकास अधिकारी एल एन पाटील(६५) यांचे १५ एप्रिल रोजी पुण्यात दुपारी तीन वाजता कोरोनाच्या उपचारा नंतर निधन झाले आहे.
उच्चशिक्षित आणि उद्योजक अश्या परिवाराचे एल एन पाटील हे आडगाव च्या सतखेडेकर परिवाराचे मार्गदर्शक होते,चोपडा शहरात त्याच्या पत्नी यमुनाबाई पाटील यांनी चोपडा नगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले होते,तर स्वतः एल एन पाटील यांनी चोपडा एलआयसी शाखेत सातत्याने विमा विकास अधिकारी म्हणून सर्वोच्च स्थानावर त्यांनी काम केले, त्याच बरोबर रोटरी क्लब चे अध्यक्ष म्हणून मोठं सामाजिक कार्य त्याचे राहिले आहे, चोपडा शेतकरी खरेदी विक्री संघात माजी चेअरमन म्हणून त्यांनी कामकाज पाहिले असून सध्या ते संचालक होते.
त्याच्या पश्चत पत्नी,दोन मुले,दोन मुली,तीन भाऊ असा परिवार आहे.गोविंदराव पाटील,संतोष पाटील,एच एन पाटील यांचे भाऊ तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक राजेश पाटील यांचे ते मामा होत.