जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११४३ रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले असून यात आज १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. याच कालावधीत १०४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ११४३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १०४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जिल्हाभरात तब्बल १८ बाधीतांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज जळगाव शहरात २९६ तर मुक्ताईनगर तालुक्यात १९७ रुग्ण आढळून आले आहेत. तर चाळीसगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.
आज दिवभरात जळगाव शहर-२९६ ; जळगाव तालुका- ४४; भुसावळ तालुका- ९९; अमळनेर-३१; चोपडा-९० ; पाचोरा-४३; भडगाव-४; धरणगाव-५५; यावल-३३; एरंडोल-१२; जामनेर-५८; रावेर-८३; पारोळा-३८;; मुक्ताईनगर-१९७; बोदवड- ५३ आणि इतर जिल्ह्यांमधील-७ असे एकूण ११४३ रूग्ण आढळून आले आहेत.