मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यात कलम 144 लागू केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवली आहे, पण ती फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच वापरता येईल. सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू राहतील.
वैद्यकीय सेवा देणारे, वाहतूक करणारे व्यक्ती, आरोग्य क्षेत्राशी निगडित सर्व लोक यांना या संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे. तसेच इतर नागरिक 15 दिवस विनाकारण घराबाहेर पडू शकणार नाहीत. पत्रकारांनाही या संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे.
लवकरच मुख्यमंत्री संपूर्ण संचारबंदीचे आदेश जाहीर करणार आहेत. उद्या रात्री आठपासून हे संचारबंदीचे आदेश संपूर्ण महाराष्ट्रात लागू असणार असून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक असल्याने त्यांना निवडणूक होईपर्यंत या संचारबंदीतुन वगळण्यात आलं आहे. तसेच ई-कॉमर्स सेवा सुरू राहणार आहे व हॉटेल व्यवसायिक फक्त ऑनलाइन सेवा तसेच होम-डिलिव्हरी देऊ शकतात.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/CFhPVDEiS9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2021
उद्या रात्री 8 वाजेपासून निर्बंध
१. ब्रेक द चेन तोडायला 144 कलम लागू , पुढील 15 दिवस
2. अनावश्यक, अयोग्य कारणास्तव बाहेर पडणे बंद
3. आपल्याला आता कळेल कोरोनादूत कोण व कोरोना वाहक कोण
4. सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
5. अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहील.
6. रुग्णालय, औषधी दुकाने, लस उत्पादक, पाणी वाहतूक, वैद्यकीय कच्चा माल, जनावर संबंधित दुकाने, शीतगृहे, रेल्वे , बस, ऑटो, दूरसंचार, इ कॉमर्स, पावसालापूर्व कामे सुरू राहील.
7. अधिस्वीकृती पत्रकार, पेट्रोलियम सेवा, कार्गो सेवा सुरू
8. बिल्डरने बांधकाम साईट्सवर कर्मचाऱ्यांची सोय करा
9. हॉटेल्स, restront होम डिलिव्हरी परवानगी, उघड्यावरील खाद्य पदार्थ सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत पार्सल द्यावे
10. 1 महिन्यासाठी लाभार्थ्यांना मोफत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ
11. शिवभोजन थाळी पुढील 1 महिना मोफत देणार
12. संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ आदि योजनांचा लाभ ऍडव्हान्स देणार
13. नोंदणीकृत बांधकाम कामगार प्रत्येकी 15 हजार तर नोंदणी कृत घरेलू कामगार यांनाही आधार देणार
अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये प्रत्येकी देणार14. परवानाधारक रिक्षाचालक यांना 1500 रुपये, खावटी धारकांना देखील दिलासा
15. कोरोनासाठी 3300 कोटी जिल्हाधिकारी यांना देणार
टाळेबंदी नाही तर निर्बंध
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/8lHPzi4Jpn
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2021