जळगाव – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत प्रवेशास मनाई असतांना पाटील गटाच्या काही लोकांनी एकत्रित येत संस्थेत प्रवेश केला होता या बाबतसंस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी धर्मदाय आयुक्त नाशिक यांच्याकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कामकाज झाले असता धर्मदाय आयुक्त यांनी पाटील गटाच्या लोकांना नोटीस काढून तुमच्या संपत्तीची जप्ती का करू नये अशी नोटीस बजावली आहे, अशी माहिती निलेश भोईटे यांनी दिली.
यांना बजावली नोटीस…
जळगाव भाजपा महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी, महेश आनंदा पाटील , मनोज भास्कर पाटील, पियुष नरेंद्र पाटील ,ललित बाबुराव भोईटे ,राजेंद्र पितांबर पाटील, शांताराम बुधा सोनवणे,विजय भास्कर पाटील व इतर यांना नोटीस बजावले भोईटे यांनी सांगितले.
नाशिक धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशाने मविप्र जळगाव संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी पुराव्यानिशी केलेला अर्ज मान्य करून अर्जावर निर्णय देताना वरील व्यक्तींविरोधात नोटीस काढण्याचे आदेश देण्यात आले असून वरील व्यक्तिंना आवारात येण्यास मनाई असताना त्यांनी आवारात प्रवेश केला व त्यांच्यामार्फत संस्थेच्या संपत्तीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नुकसान करण्यात आलेले होते हे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर 41-f नुसार तात्काळ ( व्यक्तिगत संपत्ती जप्त व एक वर्षाचा कारावास) ची कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे.
माविप्र मध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्याचे फुटेजही दिले
संस्थेत प्रवेश करून तोडफोड केलेल्या घटनेच्या दिवशी चे फुटेज तसेच महेश आनंदा पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली फिर्याद ही धर्मदाय आयुक्त यांच्या न्यायालयात दिले असून यामध्ये मोठा पुरावा ठरणार असल्याचं संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.