जळगाव- जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी आलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ६३ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून १२३ रूग्ण बरे होवून परतले आहे. विशेष बाब म्हणजे आजच्या अहवालात जिल्ह्यातील चार तालुक्यात निरंक असल्याचे दिसून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- २७, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-११, अमळनेर, चोपडा, पाचोरा प्रत्येकी १, भडगाव-४, भडगाव, एरंडोल, पारोळा, मुक्ताईनगर मध्ये निरंक (०), यावल-१, जामनेर-३, रावेर-१, चाळीसगाव-७ आणि बोदवड ३ असे एकुण ६३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण ५३ हजार ९६ रूग्ण बाधित आढळून आले असून त्यापैकी ५० हजार ८५७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज दोन रूग्णांचा मृत्यू झालाय तर जिल्ह्यात एकुण १ हजार २६१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९५.७८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.