जळगाव – आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मोहाडी येथे असलेल्या कोविड केअर सेंटर ला भेट देऊन पाहणी केली यावेळी कोविड केअर सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा, यात प्रामुख्याने जेवण, पाणी, उपलब्ध असलेली औषधी याची माहिती घेतली तसेच रुग्णांची विचारपूस केली.
मोहाडी येथील असलेल्या शासकीय महिला वैदकीय रुग्णालयातील कोविड सेंटर ला भेट दिल्यानंतर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले की कोरोना रुग्णांना कोविड सेंटर मध्ये सर्व सुविधा पुरवल्या जात असून सर्व रुग्णांवर योग्यअसे उपचार सुरू आहेत.शिवाय ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अशा रुग्णांना ऑक्सिजन मिळेल अशी योग्य व्यवस्था आहे तसेच शासकीय वैदकीय महाविदयलयाचे काही डॉक्टर हे २४ तास रुग्णांच्या सेवेत असल्याचं शिवाय एलपीएल आणि एमपीएल यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड सेंटर ला जेवण हे मोफत पुरवले जात असल्याचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या सोबत हिरेश कदम, विशाल पाटील, चंदन कोल्हे, अजय देशमुख, इत्यादी उपस्थित होते.