मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालत असल्यामुळे लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार असून लॉकडाऊनची घोषणा करणार आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी ही उद्या मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लॉकडाऊनबद्दल नियमावली तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 किंवा 8.30 वाजेच्या सुमारास जनतेशी सोशल माध्यमांद्वारे चर्चा करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, लॉकडाऊनची आज घोषणा जरी झाली तरी याची अंमलबाजवणी ही 15 एप्रिलपासून होणार आहे.
उद्या मध्य रात्री 12 वाजल्या नंतर राज्यात कडक लाँकडाऊनची अंलबजावणी सुरू होईल. यावेळी राज्यात लागू करण्यात येणाऱ्या 2.0 कडक लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना काय आणि कुठे दिलासा मिळणार हे आज जाहीर होणाऱ्या अधिसूचनेत जाहीर होईल.
https://twitter.com/ANI/status/1381938278178373632?s=19


