भुसावळ प्रतिनिधी । शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एका मोकळ्या जागेवर ठेचलेल्या मृतदेह आढळून आल्याची घटना घडली याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
भुसावळ शहरातील लिम्पस क्लब रिक्षा स्टॉप जवळ मोकळ्या जागेत रात्री उशीरा एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या चेहर्याला दगडाने ठेचल्याचे दिसून येत असल्यामुळे त्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मयताच्या उजव्या हातावर एस गोदलेले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक, शहर पोलीस स्टेशनचे बाबासाहेब ठोंबे, पोकॉ संकेत झांबरे, पोकॉ. विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, बंटी कापडणे तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्यामुळे पोलिसांना थोड्या अडचणी आल्या आहेत. मात्र हा घातपाताचाच प्रकार असल्याचे समजते.