मेष:- मानसिक ताण नियंत्रित ठेवावा. फार दगदग करू नका. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. लबाड लोकांपासून सावध राहावे.
वृषभ:- मानसिक चंचलतेवर मात करावी लागेल. खर्चाला आळा घालावा लागेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.
मिथुन:- व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. कामात चांगली ऊर्जितावस्था येईल. चांगल्या कमाईसाठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल. कामात प्रगतीला वाव आहे.
कर्क:- कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. चित्त एकाग्र करावे लागेल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. चारचौघात तुमच्या प्रगतीचे कौतुक केले जाईल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवावा.
सिंह:- धार्मिक सेवेत सहभाग नोंदवाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल. आदर्श वागणुकीतून कौतुकास पात्र व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल.
कन्या:- काही गोष्टी अकस्मात घडून येतील. चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे. एककल्ली विचार करू नका. भागीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील संभ्रम बाजूस सारावेत.
तूळ:- भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. नवीन धोरण आजमावता येतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्चिक:- आरोग्यात सुधारणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. आत्मविश्वास बाळगावा.
धनू:- अभ्यासू दृष्टिकोन बाळगावा. स्वच्छंदीपणे विचार मांडाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. परिस्थितीची चांगली बाजू विचारात घ्याल.
मकर:- विचारांची दिशा बदलून पहावी. भावंडांची काळजी लागून राहील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. कौटुंबिक गोष्टीत प्रभुत्व दाखवाल.
कुंभ:- बोलताना सारासार विचार करावा. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन कामात जोमाने उत्साह दाखवाल. जवळचा प्रवास घडेल.
मीन:- घरगुती कामाचा ताण जाणवेल. विचारणा योग्य दिशा द्यावी. बौद्धिक ताण घेऊ नये. नवीन गोष्टीं मध्ये मन रमवावे. घरगुती जबाबदारी उत्तमरित्या पार पाडाल.