नशिराबाद, जळगाव । येथील महात्मा जोतिबा फुले उत्सव समितीच्या समितीकडून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कोरोना प्रादुर्भावच्या शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंसिंग नुसार साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष भ प सुनिल महाराज यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक विश्वनाथ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सध्या कोरोणाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक लक्षात घेता रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उत्सव समितीच्या वतीने रेड प्लस जळगाव रक्तपेढी च्या मार्फत रक्त संकलन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदानात लोकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमास श्री सुनिल महाजन मोहन माळी संदिप पाटील राकेश माळी भुषण पाटील रामू माळी योगेश कोलते पांडुरंग धर्माधिकारी राहुल माळी तुषार महाजन भुषण माळी सतोष माळी मयुर महाजन वासुदेव महाजन माजी ग्रा प सदस्य प्रकाश महाजन निखील पाटील रवि माळीहोते रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला