Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा – खा. उन्मेश पाटील (व्हिडिओ)

पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला खा. उन्मेश पाटील यांची भेट

by Divya Jalgaon Team
April 8, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन, राजकीय
0
लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा - खा. उन्मेश पाटील (व्हिडिओ)

पाचोरा प्रतिनिधी । लॉकडाऊन मुळे लहान मोठे व्यापारी, कामगार, उद्योजक संकटात आले आहेत. व्यापार करतांना घेतलेले कर्ज डोक्यावर असून कामगार देखील आर्थिक संकटात आहेत.

आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची चिंता सर्वसामान्य जनतेला असताना शासनाने लॉक डाऊन घोषित केल्याने जनता हवालदिल झाली आहे. सरसकट लॉकडाऊनला व्यापारी जनता कष्टकरी कामगार यांचा स्पष्ट विरोध असून कुठल्याही परिस्थितीत या निर्णयावर शासनाने फेरविचार करावा.

खासदार पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला आज भेट देवून रूग्णांशी चर्चा केली. त्यानंतर पाचोरा येथील कापड, सराफ, रेडिमेड कपडे, ऑटोमोबाईल, वाहन दुरूस्ती गॅरेज हार्डवेअर सिमेंट स्टील व्यापारी, बुट चप्पल, इलेक्ट्रिक जनरल स्टोअर्स व्यापारी आदींची बैठक आज पाचोरा बाजार समितीच्या समोरील अटल जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार उन्मेश पाटील तर कापड रेडिमेड कपडे असोशीएशन अध्यक्ष प्रदीपकुमार संचेती, तालुका किराणा असोशिएशन अध्यक्ष जगदीश पटवारी, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, रविद्र पाटील, सराफा व्यावसायीक राजेश संचेती आदि मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यापाऱ्यांची भावना समजून घेतली. यावेळी सुनिल सराफ, नगरसेवक मनीष भोसले, राजेश संचेती, जगदीश पटवारी, प्रदीप कुमार संचेती यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आम्हाला जाचक अटींमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे सांगीतले. खासदार उन्मेश पाटील यांनी लागलीच फोनवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेशी बोलून लॉकडाऊन बाबत फेरविचार करावा अशी मागणी केली.

अन्यथा व्यापाऱ्या सोबत रस्त्यावर आंदोलन करावे लागेल अशी भुमिका मांडली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या भावना शासनाला कळवतो असे सांगितले. यावेळी जगदीश पटवारी, प्रदीप कुमार संचेती, सुनील सराफ, नगरसेवक मनिष भोसले, जगदीश खीलोशिया, अनुराग भारतीया, राजेश संचेती, निहाल बागवान, किशोर संचेती, मुर्तुजा शार्मील, हुजैफा बोहरी,मनीष बागाई, संदीप देवरे, योगेश सोनार, अमोल घाडगे, कन्हैया परसवाणी, अनुप अग्रवाल, विनोद ललवाणी,जयरामदास रिझ्झुमल,गुलाब पंजवाणी, युवा मोर्चा अध्यक्ष समाधान मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsलॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा - खा. उन्मेश पाटील (व्हिडिओ)
Previous Post

जिल्ह्यात आज ११९० रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

सेंट्रल फुले मार्केट व्यपारी संघतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Next Post
सेंट्रल फुले मार्केट व्यपारी संघतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

सेंट्रल फुले मार्केट व्यपारी संघतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group