जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११९० रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून यात ११४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
जिल्ह्यात ११९० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीत १०४२ पेशंट बरे झाले आहेत. तर आज जिल्ह्यात १५ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. अर्थात, रूग्ण देखील मोठ्या संख्येत बरे होत असले तरी मृत्यूंचे प्रमाण कमी होत नसल्याची बाब चिंताजनक अशी आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर-२९९; जळगाव ग्रामीण-१३; भुसावळ-९४; अमळनेर-१००; चोपडा-१६८; पाचोरा-३७; भडगाव-३१; धरणगाव-४३; यावल-३२; एरंडोल-१२; जामनेर-४१; रावेर-६८; पारोळा-६५; चाळीसगाव-६७; मुक्ताईनगर-७६; बोदवड-४१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे रूग्ण आढळून आले आहेत.