जळगाव – कोविड चा प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून व्यापारी वर्ग आर्थिक संकटात पडलेला असून पून्हा लॉक डाउन ला सामोरे जाण्याची आमची स्थिती नसल्यामुळे ब्रेक द चेन आदेशाअंतर्गत दुकाने सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात यावी यासाठी आज रोजी सेंट्रल फुले मार्केट व्यपारी संघतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि , कोविड चा प्रादुर्भाव पाहता शासनाने ६महिनेच्या लॉक डाउन लावला होता. त्यामुळे व्यापारीवर्गांच्या वर्ष त्या मधे वाया गेले. तरी त्या वेळेस आम्ही व्यापाऱ्यांनी शासनास पूर्ण सहकार्य केले आहेत. परंतु त्या बंद काळात आमची आर्थिक परिस्थिती फार बिकट झालेली आहे. आणि आता पून्हा लॉक डाउन ला सामोरे जाण्याची आमची स्थिती नाही. तसेच आर्थिक स्त्रोत पूर्ण पणे बंद आहेत तरी आम्हाला बँकेचे हफ्ते, कामगारांचे पगार, मनपा चे विविध कर, स्वतः चे घर खर्च व मुलांचे शिक्षण वगैरे असा अनेक खर्च दुकान बंद अथवा सुरू असो आम्हास लागू आहेतच.
त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत आमची दुकाने जास्त दिवस बंद राहिली तर कोविड पेक्षा ही भयंकर अशी परिस्थितीला समोर जावे लागणार आहे. तरी शासनाने आठवड्याचे पाच दिवस तरी दुकान सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. त्यावेळी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पूर्ण पणे पालन आमच्यामार्फत केली जाईल त्यावर जिल्हाधिकारी यांनी ही सकारात्मक भूमिका घेत शासन आदेश आल्या वर येत्या एक दोन दिवसात योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी खा. उन्मेशदादा पाटिल, आ.राजूमामा भोळे यांच्यासह सेंट्रल फुले मार्केटचे अध्यक्ष रमेश मताणी, भूषण शिंपी, केलकर मार्केटचे नरेन्द्र कावना,शंकर तलरेजा, होलसेल रेडीमेड संघचे सोमन ङाहरा, अमर दारा,नामदेव मंधान,मोहन मतानी, संजय विसरानी यांची उपस्थिती होती.