Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात 7 लाखापेक्षा अधिक संशयितांची कोरोना चाचणी

by Divya Jalgaon Team
April 8, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
राज्यात आज नव्या ८ हजार ३३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Municipal Hospital Dr's medical team inspect a man in slum area in Mumbai, where government found suspected cases. THE WEEK Picture by Amey Mansabdar (Print/OnLine) 06/04/2020

जळगाव – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे असलेल्या 7 लाख 3 हजार 712 संशयित नागरीकांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे प्रसिध्दीसाठी दिलेल्या अहवालात कोविड-19 नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाच त्यास प्रतिबंध म्हणून प्रशासनातर्फे कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान 12 ते 15 संशयितांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे आढळून येतात त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शिवाय माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्हाभरात प्रभावीपणे राबविण्यात आली त्यावेळीही ज्येष्ठ नागरीक तसेच कोमॉर्बिड रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांचेही स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहे.

शिवाय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत संपूर्ण् जिल्ह्यात सध्या कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. जेणेकरुन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचबरोबर तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांचे त्वरीत निदान होऊन त्यांचेवर त्वरीत उपचार करणे सोईचे व्हावे, याकरीताही जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात शिबिरे घेऊन संशयितांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून दैनंदिन 5 हजारपेक्षा अधिक कोरोना संशयतिांची चाचणी करण्यात येत आहे. तर बुधवार (7 एप्रिल रोजी) 11 हजार 221 कोरोना संशयितांचे अहवाल तपासण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 36 हजार 507 संशयितांची आरटीपीसीआर चाचणी तर 4 लाख 67 हजार 205 संशयितांची रॅपिड ॲन्टीजेन चाचणी असे एकूण 7 लाख 3 हजार 712 संशयितांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 6 लाख 3 हजार 856 अहवाल निगेटिव्ह तर 97 हजार 99 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1 हजार 462 अहवाल ईतर आले आहे. तपासणी करण्यात आलेल्या अहवालांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या अहवालांची टक्केवारी 7.24 इतकी आहे. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 305 कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Tags: Divya Jalgaonकोरोना चाचणीजळगाव जिल्ह्यात 7 लाखापेक्षा
Previous Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ८ एप्रिल २०२१

Next Post

महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे; आ.चौधरी

Next Post
महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे; आ.चौधरी

महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे; आ.चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group