Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ पीजी कोर्ससाठी समितीची पाहणी

by Divya Jalgaon Team
April 7, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ पीजी कोर्ससाठी समितीची पाहणी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता स्थानिक चौकशी समितीने भेट दिली. तसेच संपूर्ण महाविद्यालय व रुग्णालयात पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळी बालरोगविभाग व चिकित्सा, औषधशास्त्र विभाग, शरीररचना शास्त्र, क्ष-किरण शास्त्र, अस्थिव्यंगोपचार विभाग, बधिरीकरणशास्त्र विभाग, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, औषधवैद्यकशास्त्र या विभागात समितीने भेट दिली. यात शरीररचनाशास्त्र विभागात डॉ. शुभांगी घुले, औषधशास्त्र विभागात डॉ. सुयोग चोपडे, अस्थिव्यंगोपचारमध्ये डॉ. दीपक अग्रवाल, बधिरीकरणशास्त्रमध्ये डॉ. अभिनव हरणखेडकर, क्ष-किरणशास्त्र विभागात किरण पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागात डॉ. कैलास वाघ, बालरोग व चिकित्सा विभागात डॉ. अनंत बेंडाळे (सर्व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय) यांनी तर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागात औरंगाबाद येथील डॉ. प्रशांत भिंगारे, औषधवैद्यक शास्त्र विभागात नागपूर येथील ‘शावैम’ चे डॉ.प्रशांत भिंगाडे यांनी तपासणी केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी मान्यतेच्या कामास्तव निरीक्षणाची कार्यवाही समितीने बुधवारी पूर्ण केली. नंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थांचे निरीक्षण होईल. आगामी काळात परवानगी मिळाली तर पुढील शैक्षणिक वर्षाला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु होतील.

यावेळी शरीररचना शास्त्र विभागात प्रमुख डॉ. अरुण कसोटे, क्ष किरण शास्त्र विभागात विभागप्रमुख डॉ. अंजली कुळकर्णी, बालरोग विभाग व चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, औषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. इम्रान तेली, अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुख डॉ. योगेश गांगुर्डे, बधिरीकरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप पटेल, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र प्रमुख डॉ. संजय बनसोडे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी समितीला विभाग दाखवून माहिती दिली. यावेळी डॉ.विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. गिरीश राणे, डॉ. विश्वा भक्ता, डॉ. अतुल गाजरे, डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अश्विनी घैसास, डॉ. राहुल पाटील, डॉ. अनिल पाटील, डॉ. स्वाथी एम., डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. प्राची सुरतवाला, डॉ. किरण सोनवणे, डॉ. स्वप्नील इंकणे, डॉ. अभिजित राणे, डॉ. विजय शिंदे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. शुभांगी डांगे, डॉ. प्रियंका पाटील आदींनी परिश्रम घेतले.

अशा आहेत प्रवेश क्षमता

बालरोगविभाग व चिकित्सा – ०७
औषधशास्त्र विभाग – ०५
अस्थिव्यंगोपचार विभाग – ०१
बधिरीकरणशास्त्र विभाग – ०४
स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र – ०७
सूक्ष्मजीवशास्त्र विभाग – ०३
औषध वैद्यक शास्त्र – ०७
शरीररचना शास्त्र – ०३
क्ष किरण शास्त्र – ०३

Share post
Tags: #Maarathi newsJalgaonशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऐतिहासिक बॉयलर मशीन !
Previous Post

अभाविप जळगाव महानगराच्यावतीने नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध

Next Post

म्हसावद टायगर ग्रुपतर्फे फळ वाटपाचा कार्यक्रम

Next Post
म्हसावद टायगर ग्रुपतर्फे फळ वाटपाचा कार्यक्रम

म्हसावद टायगर ग्रुपतर्फे फळ वाटपाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group