जळगाव – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्यावतीने दिनांक 4 एप्रिल रोजी छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात 22 भारतीय जवान शहीद झाले व अनेक जखमी जवान उपचार घेत आहेत या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे व जखमी जवानांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी महानगर मंत्री आदेश पाटील यांनी राष्ट्र द्रोही विचारसरणीचा निषेध करत नक्षलवाद ना मावोवाद, सबसे उपर राष्ट्रवाद! माओवाद हो बरबाद,नक्षलवादी हो सावधान जाग उठा हे, नवजवान,भारत माता की जय, वंदे मातरम अश्या घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच भारतीय सर्व तरुणांना राष्ट्रद्रोही विचार सरणी संपवण्यासाठी एकजुटीने कार्य करणे आवश्यक आहे असे सागितले व नक्षलवादी विरोधी फलक घेऊन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून निषेध करण्यात आला. यावेळी हर्षल तांबट, चिराग तायडे, मयूर माळी, मनीष चव्हाण, रितेश महाजन,आकाश पाटील, अंकित चव्हाण, दुर्गेश वर्मा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.