चाळीसगाव – शहरातील दयानंद चौक परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले असून रस्ता खड्डेमुक्त करण्यात आले आला आहे. त्यामुळे आता शेवटची वाट देखील सुखकर झाल्याचे दिसून येत आहे.
शहरातील दयानंद चौक अमरधाम रोड येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले होतो. या खड्ड्यांमुळे अंत्ययात्रेच्या गाड्या देखील गचके खात जात असत. म्हणजेच माणसाला मृत्यूनंतर देखील या खड्ड्यांचे धक्के सहन करत अमरधामची यात्रा करावी लागत असे. ही गोष्ट चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शर्मा व नगरसेवक रामचंद्र जाधव यांच्या निदर्शनास आली असता रामचंद्र जाधव यांनी नगरपालिकेला तातडीने हे खड्डे बुजवण्याचे सांगितले.
आज स्वत: या जागेवर थांबून मुरूम टाकून हे खड्डे बुजवून घेतले आहेत. यामुळे हा संपूर्ण चौक खड्डेमुक्त झाला आहे. उद्या अमरधामपर्यंत व नवा पूल सदानंद हॉटेलपर्यंत संपूर्ण खड्डे बुजविण्याचे काम केले जणार असल्याची माहिती देखील रामचंद्र जाधव यांनी सांगितले आहे.
हे खड्डे बुजवले गेल्यामुळे निदान आता मृत्यूनंतर तरी मृतदेहाची अमर धाम यात्रा सुखकर होईल म्हणूनच जिवंतपणी खड्ड्यांमध्ये वावरत असताना मृत्यूनंतर ही पाळी येऊ नये, अशी असलेली माणसाची अपेक्षा पूर्ण होईल असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.