जळगाव – चाळीसगाव तालुक्यातील हातेल येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
संशयित आरोपी अजहर उर्फ अज्जू खाटीक (वय-२२) रा. पाटीलवाडा ता. चाळीसगाव हा फिर्यादी राजेंद्र मोरे रा. हातेल ता. चाळीसगाव यांच्या आईवडीलांच्या नात्यातील मुलीशी लग्न करण्याचे सांगत होता. मात्र याला राजेंद्र मोरे यांच्या आई व वडीलांनी लग्नाला विरोध केला होता. याचा राग मनात ठेवून २८ जून २०२० रोजीच्या मध्यरात्री आरोपी अज्जूने कुऱ्हाडीने राजेंद्र मोरे यांच्या आईवडीलांना कुऱ्हाडीने वार करून खून केला होता.
याप्रकरणी राजेंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसांत अजहर खाटीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. खून झाल्यापासून संशयित अजहर फरार झाला होता. त्याला २३ जुलै २०२० रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी अटक केली होती.
सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. आज जिल्हा सत्र न्यायालयात संशयित आरोपी अजहर खाटीक याने जामीन अर्ज दाखल केला असता जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर.जे.कटारियांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रदीप महाजन काम पाहत आहे.