चाळीसगाव: प्रतिनिधी । चाळीसगाव शहराचे आमदार मंगेश चव्हाणांसह 31 शेतकऱ्यांना १२ दिवस जेलमध्ये डांबणाऱ्या तिघाडी सरकारचे तेरावे घालत मुंडण करून निषेध करण्यात आला आहे.
या तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याने .२६ मार्च रोजी महावितरण कंपनीचे अधिकारी शेख यांना दोरीने बांधून आ. मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसोबत आंदोलन केले होते. परिणामी आमदारांसह ३१ शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.
बारा दिवस कारागृहात डांबून ठेवल्यानंतर जामीन मंजूर झाल्याने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी चाळीसगाव मतदार संघाचे आ. मंगेश चव्हाण व ३१ शेतकऱ्यांनी मिळून आज सकाळी बहाळ येथील ऋषीपांथा येथे मुंडण केले. यावेळी राज्य सरकार विरोधात जाहीर निषेध नोंदविण्यात आला. मुंडण करून तिघाडी सरकारचे तेरावे घातले व तीन पायाच्या खुर्ची वर तिघाडी सरकारचा फोटो ठेवून सरकारचे श्राध्द घालण्यात आले.