जळगाव – धरणगाव तालुका प्रशासनाच्या वतीने पाळधी बु. येथे महा. राजस्व अभियानाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा शुभहस्ते लाभार्थ्यांना व शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
तसेच जळगाव तालुक्यातील २१, जामनेर – ०९ व बोदवड – ०६ लाभार्थांना देखील वाटप केली आहे. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांचा मार्गदर्शनाखाली गटई स्टॉल वाटप करण्यात येत असून याची सुरुवात पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा शुभहस्ते पाळधी येथे करण्यात आली.
तसेच संपुर्ण जिल्हाभरामध्ये तालुकानिहाय समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक व चर्मकार संत रोहिदास महामंडळाचे प्रतिनीधी यांचा वतीने लाभार्थ्यांना गटई स्टॉल चे वितरण करण्यात येत आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने गटई स्टॉल ही योजना चर्मकार समाजासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी या योजनेचा माध्यमातून लाभ देण्यात येतो.
यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, पं. स. सभापति मुकुंदभाऊ नन्नवरे समाज कल्याण निरीक्षक महेंद्र चौधरी, जिल्हा व्यवस्थापक तडवी, तालुका समन्वयक महेंद्र पाटील, किशोर माळी, विलास भावसार व लाभार्थी हे होते.