जळगाव :- भारतीय संस्कृती मधील एक महत्वाचा सण दिवाळी आणि यानिमित्ताने आपण घरोघरी आकाशकंदील लावत असतो याच पार्श्वभूमीवर प्रगती विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती मिळावी या उद्देश्याने आकाशकंदील कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विविध प्रकारचे आकाशकंदील बनवून दाखविण्यात आले व त्यांचे सुशोभीकरण कसे करता येईल याविषयीं सखोल माहिती देण्यात आली.
यात विविध रंगाचे कार्डशीट, घोटीव कागद, चमकी, लेस इ वस्तूचा कशा पद्धतीने उपयोग करून एक आकर्षक आकाशकंदील बनवता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेला विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल तसेच अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी विद्यार्थी तसेच शिक्षक यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन मुख्याध्यापक शोभे फेगडे तर नियोजन मनोज भालेराव यांनी केले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संध्या अट्रावलकर,विजया पाटील, अविदीप पवार, अलका करणकर, रत्नप्रभा पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.