जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज पुन्हा ११८२ कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले असून यामध्ये १०९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
जिल्ह्यात आज देखील एक हजारापेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात ११८२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत १०९० पेशंट बरे झाले आहेत. आज सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहरातील असून येथील रूग्णसंख्येचा आकडा ३३३ इतका आहे.
उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१०२; भुसावळ-६०; अमळनेर-१११; चोपडा-२२३; पाचोरा-१६; भडगाव-०३; धरणगाव-३९; यावल-६३; एरंडोल-३८; जामनेर-२४; रावेर-६३; पारोळा-०२; चाळीसगाव-२; मुक्ताईनगर-६३; बोदवड-३५ आणि इतर जिल्ह्यातील १४ असे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल १५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. यातील सर्वाधीक ५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत.