मुंबई, वृत्तसंस्था : शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमके काय खावे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो.
मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी दूध हळद खूप महत्वाचे आहे. कारण हळद आणि दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते आणि यामुळे आपले हाडे मजबुत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
हळदीच्या दुधामुळे पचन करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील आंबटपणा कमी होतो. हळद मिसळून जास्त प्रमाणात दूध पिल्यास त्रास होऊ शकतो.
म्हणून, एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे.
हळदीचे दूध कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील खूप चांगले मानले जाते. हळदीमध्ये आढळणारा करक्युमीन हा घटक कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसे, तो कर्करोगाच्या रुग्णांना बरे होण्यासही मदत करतो. हळद असलेले दूध पिण्यामुळे तुमची झोपेची समस्या देखील दूर होते. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते. दुधात अमीनो अॅसिड असतात, जे चांगली झोप देण्यास प्रभावी ठरतात.
जर, तुम्हीलाही झोपेच्या समस्या असतील, तर तुम्ही आजपासून हळदचे दूध पिणे सुरू केले पाहिजे. याने तुम्हाला बराच फायदा होईल. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते.