सेंट लुईस, वृत्तसंस्था : अमेरिकेतील मिसौरी (Missouri) भारतीय अभियंत्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असलेल्या 32 वर्षीय शरीफ रहमान खान (Sharif Rahman Khan) याची गोळी झाडून हत्या करण्यात आली.
मैत्रिणीशी असलेली जवळीक खटकल्याने अमेरिकन नागरिकाने शरीफची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सेंट लुईसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरवर गोळीबार
शरीफ रहमान खान हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. गेल्या बुधवारी मिसौरीतील सेंट लुईसमध्ये युनिवर्सिटी सिटी अपार्टमेंटमध्ये त्याच्यावर गोळी झाडण्यात आली होती.


