Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आ. गिरीशभाऊ महाजन यांचा पश्‍चिम बंगालमध्ये प्रचार

भाजप उमेदवारांसाठी नियोजन बैठकांमध्ये मार्गदर्शन

by Divya Jalgaon Team
April 5, 2021
in जळगाव, राजकीय
0
आ. गिरीशभाऊ महाजन यांचा पश्‍चिम बंगालमध्ये प्रचार

जळगाव – माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन हे पश्‍चीम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले असून आज त्यांनी बालूर घाट मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या नियोजनपर बैठकीला मार्गदर्शन केले.

माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन हे पश्‍चीम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी बालघाट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी प्रचार सभा घेतल्या. तर आज दुपारी त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची नियोजनासाठी बैठक घेतली.

याप्रसंगी आ. गिरीशभाऊ महाजन म्हणाले की, पश्‍चिम बंगालमध्ये देखील आपल्याला शत प्रतिशत भाजपा या नुसार सत्तेत यायचे आहे. यासाठी अचूक नियोजन हे खूप महत्वाचे असते. विशेष करून शेवटच्या टप्प्यात प्रचार संपल्यानंतर याच अचूक नियोजनाच्या बळावर चांगल्या मताधिक्याने विजय मिळत असतो. भारतीय जनता पक्षाने पन्ना प्रमुख या संकल्पनेच्या आधारे अतिशय सुक्ष्म असे नियोजन केलेले आहे. कार्यकर्त्यांनी या नियोजनानुसार शेवटच्या टप्प्यात नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्याचे काम करावे. अर्थात, यासाठी अंतिम टप्प्यातील नियोजन हे अतिशय महत्वाचे असल्याने सर्वांनी यानुसार काम करण्याचे आवाहन आमदार महाजन यांनी याप्रसंगी केले.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये आ. गिरीशभाऊ हे अन्य मतदारसंघातील सभांना संबोधीत करणार असून प्रचार फेर्‍यांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच त्यांचा भर हा प्रामुख्याने नियोजनांच्या बैठकांवर राहणार आहे.

Share post
Tags: #Divya Jalgandivya newsJalgaonMarathi NewsPoliticalभाजप उमेदवारांसाठी नियोजन मार्गदर्शनमहाजन यांचा पश्‍चिम बंगालमध्ये प्रचार
Previous Post

माहेश्वरी समाजातर्फे कोरोना रुग्णांसाठी 15 ऑक्सिजन मशीनची सुविधा

Next Post

शहरातील कोरोना सेंटरची पाहणीत कोविड सेंटर मधिल अनेक खाटा रिकाम्या ; उपमहापौर कुलभूषण पाटील(व्हिडिओ)

Next Post
शहरातील कोरोना सेंटरची पाहणीत कोविड सेंटर मधिल अनेक खाटा रिकाम्या ; उपमहापौर कुलभूषण पाटील(व्हिडिओ)

शहरातील कोरोना सेंटरची पाहणीत कोविड सेंटर मधिल अनेक खाटा रिकाम्या ; उपमहापौर कुलभूषण पाटील(व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group