जळगाव – जळगाव शहरातील वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शहरात असलेल्या सर्व कोविड सेंटर ची आज पाहणी केली. या वेळी उपमहापौरांच्या निदर्शानास आले की कोविड सेंटर मधिल अनेक खाटा या रिकाम्या असल्याचे निदर्शनास आले.
यामधे शासकीय तंत्रानिकेत महाविद्यालय, महापालिकेचे कोविड केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर तसेच शहरातील इतर कोविड केअर सेंटर्स चा ही समावेश आहे. सध्या शहरात कोविड पॉजिटिव असणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेट करण्यात येत आहे परंतू कोणतेही लक्षण नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेट करताना शासकीय नियमांप्रमाणेच होम आयसोलेट करण्यात यावे. पॉजिटिव रुग्ण निर्धास्तपणे नियमांचे उल्लंघन करत बाहेर फिरत आहे, ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवाजी वाढत च आहे.
कोविड केअर सेंटर ची पाहणी केल्यानंतर उपमहापौर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना भेट देऊन महाविद्यालयातील असलेल्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने महाविद्यालयात उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्स ची माहिती घेतली. यावेळी मनपा चे आरोग्य अधिकारी डॉ.रावलानी, महिला बालविकास समिती सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक प्रा. सचिन पाटील , नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, रेश्मा काळे , प्रतिभा देशमुख , चेतन सनकत , प्रतिभा पाटील , किशोर बाविस्कर आदींची उपस्थिती होती.
आज केलेल्या पाहणीनंतर उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी लक्षण असणारे, लक्षणे नसणारे सर्वच रुग्णांवर शासकीय नियमांनुसार कोविड केअर सेंटर मध्येच उपचार करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. यानंतर कोणत्याही रुग्णाला होम आयसोलेट होता येणार नाही, असं ही ते यावेळी म्हणाले.तसेच यापुढे शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर स्वतः महापौर व उपमहापौर रस्त्यावर उतरून कारवाई करणार आहे , असा इशारा ही उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी दिला आहे.