जळगाव- जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजातील गरजू रुग्णांसाठी 15 ऑक्सिजन मशीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मशीनचे लोकार्पण मंडोरा टॉवर येथे समाजबांधवांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महामारीच्या काळातही माहेश्वरी समाजाच्या दातु्त्वाच्या भावनेचे दर्शन झाले.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी सरकारी, खासगी यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहेत. शासन, प्रशासनातर्फे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय माहेश्वरी समाजाने घेतला आणि समाजाप्रती आपल्या कर्तव्याची भावना म्हणून गरजू रुग्णांसाठी हे 15 ऑक्सिजन मशीन देण्यात आले. हे मशीन कोरोनाच्या होम क्वॉरंटाइन रग्णांसाठी अत्यल्प दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या मशीनच्या वापराबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तांत्रिक माहिती सुद्धा देण्यात येत आहे.
या ऑक्सिजन मशीनसाठी गरजू रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी रुपेश काबरा (9420559600) व विशाल तापडिया (9420388853) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमासाठी विष्णूकांत मणियार, यशपाल मंत्री, बालाजी भजनी मंडळ ( राठी निवास, नवीपेठ), तसेच शहरातील 8 झोनमधील आदर्शनगर, पिंप्राळा, अयोध्यानगर, नवीपेठ परिसरातील समाजबांधव आदींचे सहकार्य लाभत आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा युवा संघटन, सर्व झोन आणि जळगाव शहर सभाचे अध्यक्ष, सचिव आदी परिश्रम घेत आहेत.