Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ध्वनी प्रदुषण करणाऱ्या १७ बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई

by Divya Jalgaon Team
April 3, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
ध्वनी प्रदुषण करणाऱ्या १७ बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई

जळगाव प्रतिनिधी । आज शहरात दुचाकींचा कर्कश आवाज करणाऱ्या व ध्वनि प्रदूषण करणाऱ्या सतरा बुलेट धारकांवर कारवाई करण्यात आली आहे याप्रकरणी सतरा बुलेट वाहनांचे सायलेन्सरवर रोड रोलर फिरविण्यात आले आहे

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील टॉवरचौक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक परिसरात काही टवाळखोर बुलेटधारक वाहनाला वेगवेगळे कर्कश करणारे प्रेशर हार्न लावून शांतता भंग केला जात होता. पोलीस निरीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनुसार अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास शहर वाहतूक शाखेने गेल्या महिन्यापासुन सुरूवात केली होती.

यात एकुण १७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून २२ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. व सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. आज ३ एप्रिल रोजी जप्त केलेले १७ सायलेन्सरवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने रोड रोलर फिरवून चुराडा केला आहे. दरम्यान, ज्या वाहनधारकांनी अश्या आवाज करणारे सायलेन्सर लावले असतील तर त्यांनी काढून घ्यावेत, शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार असून अशा प्रकारची वाहने आढळून आल्यास त्यांना जप्त करण्यात येवून परवाना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांनी सांगितले आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonध्वनी प्रदुषण करणाऱ्या १७ बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई
Previous Post

31 वर्षीय विवाहितेचा पैशांसाठी छळ, गुन्हा दाखल

Next Post

दुकान, हॉटेल, नाट्यगृह अन् ट्रान्सपोर्टमधील कर्मचाऱ्यांना मिळणार ESIC

Next Post
ईएसआय रुग्णालयां

दुकान, हॉटेल, नाट्यगृह अन् ट्रान्सपोर्टमधील कर्मचाऱ्यांना मिळणार ESIC

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group