जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा पैशांसाठी छळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर येथील पतीसह पाच जणांवर रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शहरातील पिंप्राळा शिवारातील श्री अपार्टमेंट येथे माहेर आलेल्या स्मिता उदय पाटील (वय-३१) यांचा विवाह अमळनेर येथील उदय रमेशराव पाटील यांच्याशी मे २०१५ मध्ये झाला. सुरूवातीचे सहा महिने सुखाचे गेले. दरम्यान, विवाहिता ही खासगी नोकरीला आहे. विवाहितेने नोकरी सोडावी आणि माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी पती उदय पाटील यांनी पत्नीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, वडीलांची परिस्थीती नाजूक असल्याने १० लाख रूपये देवू शकत नसल्याने सासू कमलबाई रमेशराव पाटील, तारा डिगंबर पाटील रा. शेंदुर्णी ता. जामनेर, शरद रामराव साळुंखे आणि सुजित शरद साळुंखे दोन्ही रा. मारवड ता. अमळनेर यांनी शिवीगाळ करून गांजपाठ केला. हा प्रकार असह्य झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्यात. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील करीत आहे.