जळगाव प्रतिनिधी । नेरी नाका वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानने शवदाहिनी बसविली असून गत २ महिन्यात १२५ शवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या शवदाहिनीमध्ये कोरोना व सामान्य निधन झालेल्या व्यक्तींवर देखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दररोजचे होणारे मृत्यु व अंत्यसंस्कार करण्याकरिता जागेची कमतरता असल्याने महापालिका प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमी पूर्णपणे कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी राखीव ठेवली आहे.
परंतू, शवदाहिनीमध्ये कोरोना व सामान्य निधन झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नेरीनाका वैकुंठधाम मध्ये शवदाहिनी सहाय्यक मयुर सपकाळे ८२६३८ ०५८६६ यांना संपर्क करावा.