सोलापूर, वृत्तसंस्था । आता १० किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेले दुकान, हॉटेल, उपाहारगृह, नाट्यगृह, रोड ट्रान्सपोर्ट आदी कंपन्या अथवा शॉप, ऑफिस, कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही आता राज्य कर्मचारी विमा योजनेंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने नुकताच प्रसारित केला आहे.
राज्य कर्मचारी विमा निगम, केंद्र सरकारच्या सहमतीने राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. हाॅटेल, उपाहारगृहे, नाट्यगृहे यासारख्या संस्था, संघटनेत दहा किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी ईएसआय योजनेचे लाभार्थी होणार आहेत.


