मुंबई, वृत्तसंस्था : काही दिवसांपूर्वी ६० वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. यानंतर १ एप्रिल पासून सरकारनं ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याची माहिती दिली.
लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना https://cowin.gov.in या संकेतस्थळावरून किंवा आरोग्य सेतू अॅपवरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. परंतु ज्या लोकांना अपॉईंटमेंट आधी घ्यायची नसेल त्यांना आपल्या नजीकच्या कोरोना लसीकरण केंद्रावर दुपारी ३ वाजता जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली. ऑनसाईट रजिस्ट्रेशनसाठी लोकांना आपल्या सोबत आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र नेता येईल.