एरंडोल – तालुक्यातील नंदगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या सहकारी घटस्फोटित शिक्षिकेला विवाहाचे आमिष दाखवून तिचे शारीरीक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून विवाहित मुख्याध्यापकाने सहकारी घटस्फोटित शिक्षिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार एरंडोल तालुक्यातील नंदगाव येथे घडला आहे. नंदगाव (ता.एरंडोल) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महावीर गोविंदराव भिंगोले यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षिकेस लग्नाचे आमिष दाखवले. २ ऑक्टोबर २०१६ ते २३ ऑगस्ट २०१९ असे सुमारे चार वर्षे शारीरिक संबंध ठेऊन अत्याचार केले. यादरम्यान मुख्याध्यापकाने शारीरिक संबंधाचे स्मार्टफोनमध्ये चित्रण करत अश्लील फोटो काढून धमकावले. मुख्याध्यापक महावीर भिंगोला हा विवाहित असून पीडित शिक्षिका घटस्फोटित आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याध्यापकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, हवालदार मिलिंद कुमावत हे करत आहे.