मुंबई – शिवसेनेने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली असून यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा व अमरावती जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आलेली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. यात प्रत्येक मंत्र्यांकडे विविध जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा व अमरावती जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे.
नामदार गुलाबराव पाटील यांना अलीकडेच पक्षप्रवक्ते म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे. यानंतर त्यांच्याकडे याचा बुलढाणा व अमरावती या जिल्ह्यांच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.