Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पत्रकाराचा कॅमेरा व मोबाईल लांबविणाऱ्या दोन जणांना अटक

by Divya Jalgaon Team
March 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
पत्रकाराचा कॅमेरा व मोबाईल लांबविणाऱ्या दोन जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । आज शहरात एका पत्रकाराचा धूम स्टाईल ने येऊन कॅमेरा व मोबाईल लांबविणारे अल्पवयीन दोन जणांना स्थागुशाच्या पथकाने अटक व त्यांच्याकडून चोरी केलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव शहरातील सानेगुरुजी चौकातील फु्रट गल्लीच्या वळणावर लॉकडाऊनचे चित्रिकरण करीत असलेले पत्रकार अल्ताफ इस्माईल शेख (वय-३०) रा. शेरा चौक, मेहरूण यांच्याकडील कॅमेरा व मोबाईल (एमएच १९ सीडी ३३१३) क्रमांकाच्या दुचाकीवर धूम स्टाईल ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २९ रोजी भरदिवसा घडली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन दुचाकीचा शोध घेण्याचे सुचना पथकाला दिल्या.  दुचाकीवरुन येत कॅमेरा लांबविल्याची संपूर्ण घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असता यात छोटा माया, नाकतोड्या व त्याचा साथीदार असल्याचे समजले. पथकाने तात्काळ तपासचक्रे फिरवित प्रजातप नगरातून संशयित आरोपी आकाश उर्फ नाकतोडा संजय मराठे (वय २१) रा. चौघुले प्लॉट कल्पेश उर्फ बाळू देविदास शिंपी रा. घरकुल याच्यासह छोटा माया या अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून चोरी केलेला कॅमेरा, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, राहूल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांच्या पथकाने अवघ्या काही तासातच जबरी लुट करणार्‍या तिघ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

Share post
Tags: crimeJalgaonपत्रकाराचा कॅमेरा व मोबाईल लांबविणाऱ्या दोन जणांना अटक
Previous Post

चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्यासह 31 जणांना नाशिक कारागृहात रवानगी

Next Post

यावल येथील बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह मिळाला

Next Post
यावल येथील बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह मिळाला

यावल येथील बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह मिळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group