Saturday, April 4, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल येथील बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह मिळाला

by Divya Jalgaon Team
March 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
यावल येथील बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह मिळाला

चितोडा, ता.यावल – गेल्या चार ते पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवराज काशिनाथ कोलते (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सदर तरुण हा शुक्रवार (दि.२६) रोजी दवाखान्यात जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळ होऊनही युवराज हा घरी परतला नाही. गेल्या दोन दिवसापासून त्याचा शोध घेतला तरी देखील मिळून आला नाही. मात्र, आज गावाशेजारील देविदास पाटील यांच्या शेतातील विहिरीत युवराज कोलते याचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकलेले नाही. परंतु मागील काही दिवसापासून तो वेडपणा सारख करीत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तायडे यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून याप्रकरणी यावल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार नेताजी वंजारी हे करीत आहे.

Share post
Tags: Divya Jalgaondivya newsचितोडाता.यावलबेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह
Previous Post

पत्रकाराचा कॅमेरा व मोबाईल लांबविणाऱ्या दोन जणांना अटक

Next Post

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या भूमिपूजन

Next Post
balasaheb sanman yojana

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group