जळगाव – शहरातील गोलाणी मार्केटच्या प्रसाधनगृहात एका विक्रेत्याने सामान ठेवल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला होता या वृत्ताची दखल घेत महापौर सौ.जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली होती.
शहरातील व्यापारी संकुलातील बहुतांश स्वच्छतागृहे बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असून ते सुरू करण्यासंदर्भात आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग, आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन गोलानीमार्केट मधील स्वच्छता गृहे पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली यावेळी स्वच्छतागृहे पुन्हा दुरुस्त करणे, स्वछता गृहांमध्ये पाणी पुरवठा व्यवस्था करणे, तसेच शहरातील अनेकभागात गटारीच्या आणि सार्वजनिक स्वछता गृहे यांच्या अनेक तक्रारी आहेत त्याबाबत चर्चा करून आणि तांत्रिक बाबी समजून घेऊन अधिकाऱयांना गटारी, स्वछतागृहे दुरुस्त करणे आणि पूर्णकाऱ्यांवित करणे याबाबत सूचना केल्यात.
तसेच कोरोना रुग्णांची शहरात वाढ होत आहे म्हणून रुग्णांना बेड कमी पडू नये म्हणून इकरा कोविड केअर सेंटर मध्ये २०० बेड खाली असून जळगाव मनपा कोविड सेंटर हे रुग्णांसाठी नेहमी कार्यान्वित असेल तसेच रुग्णांसाठी पौष्टिक आहार दिला जातो तसाच आहार नेहमी दिला जाईल असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले