जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज नवीन ११८३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. यात जळगावात सर्वाधिक आढळून आले आहे. आतापर्यंत १ हजार ५३९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे.
जळगाव शहर-२७४, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१४३, अमळनेर-८८, चोपडा-१९५, पाचोरा-१५, भडगाव-१०, धरणगाव-६९, यावल-३२, एरंडोल-१२२, जामनेर-४१, रावेर-३६, पारोळा-४८, चाळीसगाव-२८, मुक्ताईनगर-४७, बोदवड-२१, इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १ हजार १८३ बाधित आढळून आले आहे.
कोरोना अहवालात आजवर ८१ हजार ९८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६९ हजार ९७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. १० हजार ४५४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज तब्बत १३ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार ५३९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.