जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा येथे जिल्हाधिकारी नियुक्त नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
दररोज १५०० नमुना तपासणी झाली पाहिजे असे उद्दिष्ट ठेवा असे यावेळी हुलवळे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सांगितले.
प्रसंगी विभाग प्रभारी डॉ. शुभांगी डांगे यांनी त्यांना विभागाची माहिती दिली. विभागात नमुने तपासणीबाबतची कार्यवाही कशी केली जाते, तसेच मनुष्यबळ व साधनसामुग्री याबाबत तुकाराम हुलवळे यांनी जाणून घेतले. याशिवाय विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संवाद साधून प्रयोगशाळेतील कामकाज आणखी वाढवून दररोज १ हजार ५०० तपासणी होतील असे उद्दिष्ट ठेवा अशी माहिती दिली. तसेच विभागातील अडचणी जाणून घेत विविध सूचना देखील हुलवळे यांनी केल्या. प्रयोगशाळेचा दररोज आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.