जळगाव ः जिल्ह्यातील प्राध्यापकांसह शिक्षक, नाभिक समाज बांधवांना कोरेाना लसीकरण करण्यात यावे असे साकडे प्राध्यापक संघटना, नाभिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना घातले आहे.
जळगाव जिल्हा नाभिक समाज महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीने थैमान घातले असुन या महामारीवर प्रतिबंध रोखण्यासाठी भारत सरकारतर्फे कोविड 19 लस देण्यात येत आहे.
नाभिक समाजाचा व्यवसाय सलुन ( केस कर्तनालय) असुन आमच्या बांधवांचा संपर्क सर्व सामान्य जनतेशी केस कर्तन तसेच दाढी करताना रोज येतो. जसे प्रशासनामार्फत डॉकटर्स, पोलिस कर्मचारी, आरोग्यसेवक यांना ज्याप्रकारे लसीकरण देण्यात आले आहे. तसेच नाभिक समाज बांधवांनाही देण्यात यावे. यामुळे कारागिर बाधंव आपला जिव धोक्यात घालून जनतेची सेवा करीत आहे. या कारागिर बांधवाना लसीकरण प्रशासनाने आपल्या माध्यमातुन करण्यासाठी आमच्या जिल्हाभरातील नाभिक समाजास सलुन व्यवसायिक व कारागिर बांधवाना देण्यासाठी कॅम्प घेण्यात यावा.