जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर रूम, खाटा प्रवेश व्यवस्थापन समिती, मृत्यू समन्वय समिती नेमण्यात आली आहे. त्याचे कामकाज मंगळवारी २३ मार्च रोजी सुरु झाले आहे. त्याबाबतचे मोबाईल नम्बर जाहीर करण्यात आले आहे.
यात वॉर रूमचा नम्बर ८७६७१९९४७६ हा असून येथे नागरिक त्यांचे शंका तसेच, नातेवाईक त्यांच्या रुग्णांच्या प्रकृतीविषयी माहिती विचारू शकतात. नागरिकांशी संवाद साधणे, त्यांना माहिती देणे हे काम वॉर रूमचे आहे. तर खाटा प्रवेश व्यवस्थापन समितीचा नम्बर ९३५६९४४३१४ असा असून येथे शासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध आहे काय याची माहिती दिली जाणार आहे. तर मृत्यू समन्वय समिती जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याबाबतची पुढील कार्यवाही करण्याचे काम हि समिती करणार आहे. या समितीचा नम्बर ८७६७३२४१३३ असा आहे.
नागरिकांनी संबंधित सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.