जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोरोना महामारीच्या आजारावर मात करून पुन्हा अधिष्ठातापदावर रुजू झाले आहेत. सकाळीच त्यांनी पूर्ण रुग्णालयाचा राउंड घेऊन परिस्थिती जाणून घेतली.
डॉ. रामानंद हे १० मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तब्बल १३ दिवस उपचार घेतल्यानंतर ते उपचारातून बरे होऊन मंगळवारी २३ रोजी कर्तव्यावर रुजू झाले. सकाळी १० वाजता सर्व विभागात जाऊन त्यांनी स्थिती जाणून घेतली. डॉक्टर्स व परिचारिका, कक्षसेवक आदी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विविध सूचना अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केल्या. रुग्णांशी देखील संवाद साधत त्यांनी धीर दिला. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
त्यानंतर दिवसभर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक व इतर दैनंदिन कामकाजात सहभाग घेतला.