जळगाव- नेहमी गरीब, गरजू रुग्णांच्या सेवेला प्राधान्य दिलेल्या स्रीरोग तज्ज्ञ स्व.डॉ.कविता सोनटक्के यांची आज जयंती. राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था, मन:शांती परिवार व डॉ. सोनटक्के मँडमांना मानणाऱ्या असंख्य रुग्ण, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आदींतर्फे मँडमांना जयंतीनिमित्त शब्दसुमनांजली अर्पण करण्यात येत आहे. मँडमांच्या जयंतीनिमित्त अनेकांनी त्यांच्या स्मु्तिंना उजाळा दिला.
डॉ. कविता सोनटक्के यांचे कुटुंब मूळचे नागपूर येथील सेवाभावी संस्कारातील. परंतु, त्या सर्वाधिक रमल्या जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेत. सुरुवातीला एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेल्या अनेक रुग्णांना त्यांचे नातेवाईक सुद्धा जणू वाडीत टाकल्यासारखे वागणूक द्यायचे. एचआयव्ही बाधीत महिला रुग्णांची प्रसुती, त्यांचे सिझर व अन्य उपचार सुद्धा करणे बहुसंख्य खासगी डॉक्टर नाकारायचे. अशा रुग्णांना थेट सिव्हील हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला देवून खासगी डॉक्टर मोकळे व्हायचे. या रुग्णांची सेवा सिव्हील हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. कविता सोनटक्के, डॉ. उदयसिंग पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. मंँडमांनी एचआयव्हीबाबत व त्यावरील उपचारासंदर्भात जनजागु्तीचे उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रेड लाइट एरियात स्वत: जाऊन कर्मशियल सेक्स वर्कर महिलांना एचआयव्हीबाबत माहिती दिली.
या महिलांची आरोग्य तपासणी करुन बाधितांवर उपचार केले. तसेच मँडमांनी त्या महिलांना काळजी घेण्यासाठी साधनंही उपलब्ध करुन दिले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या काळात एचआयव्ही बाधीत सुमारे 200 महिलांचे यशस्वीरित्या सिझर केले. त्यामुळे अनेक एचआयव्ही बाधीत महिलांना जणू पुनर्जन्म मिळाला.
या महान कार्यामुळे या महिला मँडमांना त्यांच्या ‘मदर’ च संबोधायच्या. मँडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवलेला राष्ट्रीय कार्यक्रम राज्यात उल्लेखनीय होता. त्यामुळे ते कार्य ‘जळगाव पँटर्न’ म्हणून राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यांनी कुटुंब कल्याण, लेक बचाव आदी राष्ट्रीय कार्यक्रमात टार्गेट ओरिएंटेड काम केले. त्यामुळे शासनातर्फे प्रशासनास देखील मानाचे स्थान मिळाले होते.
त्यांचे सामाजिक कार्य देखील वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या कार्यास त्यांचे पती व केमिकल इंजिनियर सतीश सोनटक्के यांची नेहमी मोलाची साथ मिळाली. मँडमांना पर्यटनाचा सुध्दा मोठा छंह होता. त्यांच्या मैत्रीण योगिनी पाटील व परिवारासोबत त्यांनी सन 2002 मध्ये कैलास मानसरोवर यात्रा व इतर वेळी अनेक मोठ्या ठिकाणी पर्यटन केले. गरिबांच्या मायबाप डॉक्टर म्हणून परिचित झालेल्या डॉ. कविता सोनटक्के यांना जयंतीनिमित्त अभिवादन…!


