जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज मोठा स्फोट आढळून आला आहे. जिल्ह्यात तब्बल ९९४ रूग्णकोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज जळगाव शहरात सर्वाधीक २९० रूग्ण आढळून आले आहेत. यासोबत चोपडा तालुक्यात १६० रूग्ण आढळून आले आहेत. तर भुसावळात तब्बल २२२ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच ७१९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता जळगाव ग्रामीण-५७; अमळनेर-११; पाचोरा-१५; भडगाव-६२; धरणगाव-६६; यावल-३२; एरंडोल-१; जामनेर-१९; पारोळा-५१; चाळीसगाव-४५; बोदवड-३ तर मुक्ताईनगर आणि रावेरात आज Corona रूग्ण आढळून आले नाहीत. आज दिवसभरात ८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतच आहे. आजवर जळगाव शहरासह पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, धरणगाव आदी शहरांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आले आहेत. मात्र अजूनही संसर्ग कमी होतांना दिसून येत नाही. यामुळे आता अन्य तालुक्यांमध्येही याच प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील असे संकेत आता मिळाले आहेत.