यावल प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांसाठी मंगल कार्यालय आणि खुल्या भुखंडावर उद्यान बांधण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.
शहरातील विस्तारीत भागात गणपतीनगर व तिरुपतीनगर मधील गट क्रमांक ७५४ मध्ये खुल्या भुखंडावर याप्रसंगी उद्यानाचे बांधकाम सुरू असुन प्रगतीपथावर आहे. सदरच्या महिला उद्यान (गार्डनला ) सार्वजनिक पुरुष व महिलांसाठी खुले केले जावे. या खुल्या जागेवर मुस्लिम समाज बांधवासाठी मंगल कार्यालय ( शादी हॉल ) बांधुन देण्यात यावा, सद्या ज्या ठिकाणी पाण्याचा फवारा/कारंजा केलेल्या आहे. त्या बाजूला एक मोठा हायमस्ट लाईट लावण्यात यावे. या महिलासाठीच्या उद्यानास सर्वांसाठी खुले करण्यात यावे. त्यामुळे झाल्यास परिसरातील लहान बालके, जेष्ठ नागरीकांना त्याचा वापर करता येईल. या मागणीचे निवेदन नगरपरिषेदला देण्यात आले.
सदरील निवेदन पालिकेचे शिवानंद कानडे, योगेश मदने यांना देण्यात आले आहे. या मागणी निवेदनावर अशपाक शहा, मोहम्मद ताहीर अशरफ कुरेशी, युनिस खान हुसेन खान, रमजान बिराम तडवी, इस्माईल शेख मोहम्मद, शरीफ ईसा पटेल, सालिया अजहरद्दीन, ईसाक टेलर, मुक्तार ईसा पटेल, जलील सर यांच्यासह परिसरातील राहणाऱ्या नागरीकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.